बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षकांसाठी ४६७ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत माध्यमिक विभागासाठी शिक्षण सेवक संवर्गातील पदे भरण्यात येणार आहेत. यामध्ये प्रशिक्षित पदवीधरांसाठी मराठी माध्यम (१३९ जागा), हिंदी माध्यम (६४ जागा), उर्दु माध्यम (३० जागा), गुजराथी माध्यम (७ जागा), कन्नड (४ जागा), तामिळ/इंग्रजी (२० जागा), प्रशिक्षित अपदवीधरांसाठी मराठी माध्यम (७० जागा), हिंदी (२६ जागा), उर्दु (१३ जागा), गुजराथी (२ जागा), कन्नड (३ जागा), तामिळ/इंग्रजी (४ जागा) तसेच कायम विनाअनुदानित माध्यमिक शाळेत मराठी माध्यम (३९ जागा), हिंदी माध्यम (३३ जागा), गुजराथी (१ जागा), तेलगू (५ जागा), इंग्रजी (७ जागा) ही पदे आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. २ डिसेंबर २०१० ते १४ डिसेंबर २०१० या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २५ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
मुंबई विद्यापीठात ६८ जागा
मुंबई विद्यापीठात उपकुलसचिव- सामान्य प्रशासन (६ जागा), उपकुलसचिव –जनसंपर्क (१ जागा), सहायक कुलसचिव-सामान्य प्रशासन (१५ जागा), अधीक्षक (२० जागा), सहायक कुलसचिव –वित्त व लेखा (५ जागा), उपलेखापाल (८ जागा), स्वीय सहायक (३ जागा), उच्चश्रेणी लघुलेखक (५ जागा), सुरक्षा अधिकारी (१ जागा), विद्यापीठ अभियंता (२ जागा), कनिष्ठ अभियंता (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २४ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mu.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मुंबई आयआयटीमध्ये ५ जागा
भारतीय प्रौद्योगिक संस्थान, मुंबई (आयआयटी) येथे विविध विभागात कनिष्ठ तांत्रिक अधिक्षक (५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ डिसेंबर २०१० आहे. संबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १८ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.