Tuesday, December 7, 2010

Jobs | Maharashtra Jobs 7 December 2010-2

नॅशनल इन्शुरन्स कार्पोरेशनमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या ३०० जागा
नॅशनल इन्शुरन्स कार्पोरेशनमध्ये प्रशासकीय अधिकारी (३०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ डिसेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.nationalinsuranceindia.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय हवाई दलात एअरमनच्या ७५० जागा

भारतीय हवाई दलात भरती मेळावा आयोजित करण्यात येणार असून त्यात एअर मन (७५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ही भरती १५ ते २२ डिसेंबर २०१० या कालावधीत होणार आहे. अधिक माहिती दै. लोकमतमध्ये ११ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय स्टेट बँकेत ९ जागा

भारतीय स्टेट बँकेत माहिती तंत्रज्ञान विशेषज्ञ अधिकारी (९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०१० आहे. संबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १८ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.sbi.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.