केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये पदवीधर शिक्षकांच्या ५९९ जागा
केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (५९९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.kvsangathan.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयागोमार्फत २८ जागांसाठी भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयागोमार्फत अतिरिक्त संचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा (१ जागा), सहायक भूवैज्ञानिक (२२ जागा), सहायक प्रशासकीय अधिकारी (२ जागा), वरिष्ठ खोदन अभियंता (१ जागा), सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ (१ जागा), सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोष निर्मिती मंडळ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ३ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
ठाणे जिल्हा परिषदेत ३४ जागा
ठाणे जिल्हा परिषदेत प्रधान मंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत कनिष्ठ अभियंता (१२ जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहायक (१३ जागा), वरिष्ठ लिपिक (३ जागा), वाहन चालक (५ जागा), शिपाई (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. १ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
रेल्वे भरती मंडळात टेक्निशियनच्या ४८३ जागा
रेल्वे भरती मंडळात अपंग तसेच मागासवर्गीय भरती अंतर्गत टेक्निशियन (४८३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://rrcb.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.