डाक विभागात मागासवर्गीयांसाठी १५ जागा
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र व गोवा परिमंडळात मागासवर्गीयांसाठी डाक सहायक/सॉर्टिंग सहायक (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ डिसेंबर २०१० पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ता व महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ६६ जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुध प्रापण व वितरण अधिकारी/दूध वितरण अधिकारी (१ जागा), दुग्ध व्यवसाय विभागातील प्रशासन गट (४ जागा), अधिव्याख्याता-कामगार कल्याण (१ जागा), सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य (४० जागा), उपसंचालक-औद्योगिक सुरक्षा व आरोग्य (१६ जागा), मनोविकृती चिकित्सक (४ जागा) ही भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १ नोव्हेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये शिक्षकांच्या ३५० जागा
केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये पदव्युत्तर पदवीधर शिक्षक (३५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.kvsangathan.nic.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.