इस्त्रोमध्ये २३ जागा
भारतीय अवकाश संशोधन केंद्रात (इस्त्रो) टेक्निशियन (२० जागा), ड्राफ्टसमन (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती www.sac.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंच्या १२ जागा
दक्षिण मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंच्या १२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.
ठाणे परिवहन सेवेत वाहक, चालकांच्या ३१६ जागा
ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेत वाहन चालक (२१६ जागा), वाहन वाहक (१०० जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखती दि. ८ ऑक्टोबर व ११ ऑक्टोबर २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. ३० सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
एसआयडीबीमध्ये ९७ जागा
भारतीय लघु उद्योग विकास बँक (एसआयडीबी) मध्ये सहायक व्यवस्थापक (९५ जागा), व्यवस्थापक (०२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.sidbi.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २९ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.