संरक्षण संशोधन व विकास विभागात २५ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागात मागासवर्गीयांसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत सायंटिस्ट (२५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - १ ऑक्टोबर च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://rac.drdo.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदाच्या ६१०० जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक (६१०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.sbi.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २९ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
आयडीबीआय बँकेत १०६७ जागा
आयडीबीआय बँकेत विशेष सहायक व्यवस्थापक (८८० जागा), व्यवस्थापक (१०४ जागा), सहायक सरव्यवस्थापक (८३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.idbi.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २९ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.