Tuesday, October 5, 2010

jobs | Maharashtra jobs 5 oct 2010-3

अंबरनाथ येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत २०० जागा
अंबरनाथ येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत बॉयरल अटेंडंट (६ जागा), इलेक्ट्रिशियन (१५ जागा), इलेक्ट्रोप्लेटर (१२ जागा), मेकॉनिस्ट (३९ जागा), मोल्डर/फौन्ड्रीमॅन (५९ जागा), फिटर/इलेक्ट्रॉनिक्स (१५ जागा), फिटर (२१ जागा), मिलराइटर (१७ जागा), टर्नर (६ जागा), वेल्डर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

एमपीएससीमार्फत सहायक अभियंत्यांच्या २७४ जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक अभियंता -विद्युत (२७४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.mpsconline.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. १ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत २३८ जागा
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत फायर इंजिन ड्रायव्हर (१ जागा), फायरमन (१७ जागा), दरवान (९ जागा), मेडिकल असिस्टंट (१ जागा), वॉर्ड सहायक (१ जागा), लेबर (४६ जागा), बॉयलर अटेंडंट (१ जागा), कारपेंटर (२ जागा), डंगर बिल्डिंग वर्कर (१३६ जागा), इलेक्ट्रिशियन (१ जागा), फिटर बॉयलर (३ जागा), फिटर मेकॉनिक (४ जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (३ जागा), फिटर पाईप (२ जागा), फिटर रेफ्रिजिरेटर (३ जागा), मेशन (३ जागा), मिलर (१ जागा), टर्नर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांच्या १४५६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखाली येणार्‍या औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये विविध विषयांचे शिक्षक (१४५६ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोबर २०१० पर्यंत आहे. यासंबंधीची अधिक माहिती व अर्ज www.dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. १ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे अधिकार्‍यांच्या ५२२ जागांसाठी भरती

केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे संरक्षण दलाच्या संयुक्त संरक्षण सेवा परीक्षेद्वारे अधिकारी पदाच्या एकूण ५२२ जागांसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - १ ऑक्टोबर च्या अंकात आली आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.