Saturday, October 30, 2010

Jobs | Maharashtra Jobs 31 Oct 2010-3

कर्मचारी राज्य विमा महामंडळात १२ जागा
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या महाराष्ट्र क्षेत्रासाठी स्टेनोग्राफर (१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज www.esicmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ११ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये ३२२ जागा

ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (३२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती https://www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ८५० जागा
इंडियन बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (८५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.indianbank.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षकांच्या २३८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रशिक्षित शिक्षक-हिंदी (५४ जागा), प्रशिक्षित शिक्षक-कन्नड (३ जागा), प्रशिक्षित शिक्षक - तेलगू (१४ जागा), प्रशिक्षित शिक्षक-मुंबई पब्लिक स्कूल (८२ जागा), अंशकालीन प्रशिक्षित शिक्षक- मुंबई पब्लिक स्कूल (८५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. ११ ऑक्टोबर २०१० ते १६ ऑक्टोबर २०१० या कालावधीत होणार आहेत. या संबंधीची सविस्तर जाहिरात दै. सामनामध्ये दि. २ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.