खडकी येथील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये ५२ जागा
पुण्यातील खडकी येथील आर्मी बेस वर्कशॉपमध्ये इलेक्ट्रिशियन (१२ जागा), टेलिकॉम मेकॉनिक (८ जागा), पी अँड डी (५ जागा), कूक (१ जागा), लॅब असिस्टंट (१ जागा), स्टोअर किपर (६ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (१४ जागा), फायर इंजिन ड्रायव्हर (१ जागा), ड्राफ्टसमन (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - १ ऑक्टोबर च्या अंकात आली आहे.
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या २५२२ जागा
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल - ट्रेडसमन (२५२२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसात करावेत. अधिक माहिती http://www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.
अंबरनाथ येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत २०० जागा
अंबरनाथ येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत बॉयरल अटेंडंट (६ जागा), इलेक्ट्रिशियन (१५ जागा), इलेक्ट्रोप्लेटर (१२ जागा), मेकॉनिस्ट (३९ जागा), मोल्डर/फौन्ड्रीमॅन (५९ जागा), फिटर/इलेक्ट्रॉनिक्स (१५ जागा), फिटर (२१ जागा), मिलराइटर (१७ जागा), टर्नर (६ जागा), वेल्डर (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत २३८ जागा
भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत फायर इंजिन ड्रायव्हर (१ जागा), फायरमन (१७ जागा), दरवान (९ जागा), मेडिकल असिस्टंट (१ जागा), वॉर्ड सहायक (१ जागा), लेबर (४६ जागा), बॉयलर अटेंडंट (१ जागा), कारपेंटर (२ जागा), डंगर बिल्डिंग वर्कर (१३६ जागा), इलेक्ट्रिशियन (१ जागा), फिटर बॉयलर (३ जागा), फिटर मेकॉनिक (४ जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (३ जागा), फिटर पाईप (२ जागा), फिटर रेफ्रिजिरेटर (३ जागा), मेशन (३ जागा), मिलर (१ जागा), टर्नर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.
दक्षिण मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंच्या १२ जागा
दक्षिण मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंच्या १२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १८-२४ सप्टेंबरच्या अंकात आली आहे.
एसआयडीबीमध्ये ९७ जागा
भारतीय लघु उद्योग विकास बँक (एसआयडीबी) मध्ये सहायक व्यवस्थापक (९५ जागा), व्यवस्थापक (०२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.sidbi.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २९ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.