पंजाब आणि सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ७०० जागा
पंजाब आणि सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (४४० जागा), हिंदी ऑफिसर (१० जागा), सुरक्षा अधिकारी (२५ जागा), कृषि अधिकारी (१०० जागा), चार्टर्ड अकाऊंटंट (३० जागा), ईडीपी ऑफिसर (६० जागा), फोरेक्स ऑफिसर (३५ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती व अर्ज www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
पुणे विद्यापीठात १६ जागा
पुणे विद्यापीठात अंतर्गत हिशोब तपासणीस (१ जागा), सहायक वित्त अधिकारी (१ जागा), प्रोग्रामर (८ जागा), आरोग्य अधिकारी (१ जागा), उपअभियंता (२ जागा), कर्मशाळा अधिक्षक (१ जागा), स्थावर व्यवस्थापक (१ जागा), सहायक अभियंता-स्थापत्य (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://recruitment.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. लोकमतमध्ये दि. १३ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात तांत्रिक अधिकारी पदाच्या ६६ जागा
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागात प्रोग्रामर/असिस्टंट प्रोग्रामर (२७ जागा), सल्लागार/ उप सल्लागार (३९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.cbi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.