संरक्षण संशोधन व विकास विभागात २५ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन व विकास विभागात मागासवर्गीयांसाठी विशेष भरती मोहिमेअंतर्गत सायंटिस्ट (२५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - १ ऑक्टोबर च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://rac.drdo.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक पदाच्या ६१०० जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक (६१०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधी अधिक माहिती http://www.sbi.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २९ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
आयडीबीआय बँकेत १०६७ जागा
आयडीबीआय बँकेत विशेष सहायक व्यवस्थापक (८८० जागा), व्यवस्थापक (१०४ जागा), सहायक सरव्यवस्थापक (८३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.idbi.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. २९ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबलच्या १९ हजार ८५७ जागा
सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल -जीडी (१९८५७ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://www.bsf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
विजया बँकेत अधिकारी पदाच्या ६६५ जागा
विजया बँकेत स्पेशालिस्ट/जनरललिस्ट ऑफिसर (४३७ जागा), प्रोबेशनरी असिस्टंट मॅनेजर (२२८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://vijayabank.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक महानगरपालिकेत २३ जागा
नाशिक महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वॉर्डबॉय (१३ जागा), आया (१० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
प्रिंन्सिपल अकाउंटंट जनरल कार्यालयात १८६ जागा
ऑफिस ऑफ द प्रिंन्सिपल अकाउंटंट जनरल (सिव्हील ऑडिट) या कार्यालयात १८६ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४-१० सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅस्टेस्टिक वर्कशॉपमध्ये ९ जागा
अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅस्टेस्टिक वर्कशॉप, इएमई येथे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॉनिक (१ जागा), इलेक्ट्रिशियन (१ जागा), कूक (२ जागा), सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर (१ जागा), फायर इंजिन ड्रायव्हर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १ महिन्याच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.