भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अभियंत्याच्या ९ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अभियंता (९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.bel-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ८ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबलच्या ८३६६ जागा
सशस्त्र सीमा दलात कॉन्स्टेबल (८३६६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. यात महाराष्ट्रातील ५२१ जागांचा समावेश आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत ज्युनिअर ट्रान्सलेटर परीक्षा
स्टाफ सिलेक्शन कमिशनअंतर्गत ज्युनिअर ट्रान्सलेटर/ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा घेण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.