स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये १८० जागा
स्टिल अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये प्रशिक्षणार्थी ज्यु. ऑपरेटर/टेक्निशियन-अटेंडंट (१३० जागा), ऑपरेटर कम टेक्निशियन (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ४ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती www.sail.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ८ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
स्पेशल क्लास रेल्वे ऍप्रेन्टिस परीक्षेद्वारे ४४ जागांसाठी भरती
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत स्पेशल क्लास रेल्वे ऍप्रेन्टिस परीक्षा घेण्यात येणार आहे. या पदाच्या एकूण ४४ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ सप्टेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलात १७१ जागा
इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलात कॉन्स्टेबल/पायोनिअर (१७१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ सप्टेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये १० जागा
सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये मुख्यव्यवस्थापक-फॉरेन्सिक (१ जागा), मुख्य व्यवस्थापक - चौकशी (१ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक-डिटेक्टिव्ह (२ जागा), संरक्षण बँकिंग सल्लागार (३ जागा), फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर (१ जागा), बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. ८ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.