Tuesday, September 14, 2010

jobs | Maharashtra Jobs Sept 14, 2010-2

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या १५० जागा
बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (१५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.bankofmaharashtra.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४-१० सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.

रायगड उप जिल्हा रुग्णालयात ३ जागा
रायगडमधील उपजिल्हा रुग्णालयात जनरल सर्जन (१ जागा), बालरोग तज्ज्ञ (१ जागा), भिषक (१ जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १४ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅस्टेस्टिक वर्कशॉपमध्ये ९ जागा
अहमदनगर येथील आर्म्ड स्टॅस्टेस्टिक वर्कशॉप, इएमई येथे इंजिनिअरिंग इक्विपमेंट मेकॉनिक (१ जागा), इलेक्ट्रिशियन (१ जागा), कूक (२ जागा), सिव्हिलियन मोटार ड्रायव्हर (१ जागा), फायर इंजिन ड्रायव्हर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १ महिन्याच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.