अंबरनाथ येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत १ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या अंबरनाथ (ठाणे) येथील मशिन टूल प्रोटोटाईप फॅक्टरीत फिटर (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज एम्प्लॉयमेंट न्यूजमध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. ६ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भेलमध्ये अधिकारी पदाच्या १४०० जागा
भारत हेवी ईलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) मध्ये प्रशिक्षणार्थी अभियंता (६०० जागा), प्रशिक्षणार्थी सुपरव्हायजर (८०० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://careers.bhel.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. १ सप्टेंबर २०१० रोजी आली आहे.
खडकी येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत २४१ जागा
खडकी (जि. पुणे) येथील इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरीत एओसीपी (६२ जागा), फिटर-जनरल मेकॉनिक (२४ जागा), बॉयलर अटेंडंट (१ जागा), इलेक्ट्रिशियन (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २८-३ सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे