बृहन्मुंबई महानगर पालिकेत विश्लेषकाची १ जागा
बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या आरोग्य खात्यात महानगरपालिका विश्लेषक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. १ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रकल्पग्रस्तांसाठी १९६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी पुरुष कामगार (१८१ जागा), महिला -आया (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
डाक विभागात डाक सहायक/छाननी सहायकाच्या १०१३ जागा
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात डाक सहायक/छाननी सहायक (१०१३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटीची तारीख ५ ऑक्टोबर २०१० पर्यंत आहे. अर्ज व इतर सविस्तर माहिती सर्व मुख्य टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदाच्या १८३ जागा
भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट अधिकारी पदाच्या १८३ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://sbi.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.