महाजनकोमध्ये २४५ जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मंडळात महा व्यवस्थापक- वित्त व लेखा (१ जागा), सह मुख्य लेखा अधिकारी (२ जागा), उपमुख्य लेखा अधिकारी (३ जागा), लेखा अधिकारी (८ जागा), विभागीय लेखापाल (१८ जागा), सहसंचालक-एचआर (१ जागा), एस्टॉब्लिशमेंट ऑफिसर (२ जागा), डेप्युटी एस्टॉब्लिशमेंट ऑफिसर (२ जागा), सहायक पर्सोनेल ऑफिसर (३ जागा), एस्टॉब्लिशमेंट सुपरिटेंडंट (१ जागा), मुख्य लिपिक (१ जागा), स्टेनो टायपिस्ट (१ जागा), दूरध्वनी चालक (३ जागा), सिस्टिम अनॉलिस्ट (१ जागा), उप कार्यकारी अभियंता (२९ जागा), सहायक अभियंता (१६९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी लिपिकाच्या ७०० जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी लिपिक (७०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.unitedbankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबलच्या ८५० जागा
इंडो तिबेट बॉर्डर पोलीस फोर्समध्ये कॉन्स्टेबल-जनरल डय़ुटी (८५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.itbpolice.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २५ जुलै २०१० प्रसिद्ध झाली आहे.
पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये १५ जागा
पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये व्यवस्थापक-टेक्निशियन (१ जागा), उपव्यवस्थापक (६ जागा), सहायक व्यवस्थापक (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://pfcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.