बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिकाच्या ३०० जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत परिचारिका (३०० जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. २० व २१ सप्टेंबर २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ता व सामनामध्ये दि. १५ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
प्रिंन्सिपल अकाउंटंट जनरल कार्यालयात १८६ जागा
ऑफिस ऑफ द प्रिंन्सिपल अकाउंटंट जनरल (सिव्हील ऑडिट) या कार्यालयात १८६ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसात करावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४-१० सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेत १ जागा
भारतीय रिझर्व्ह बँकेत सहायक कूक (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ सप्टेंबर २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ४-१० सप्टेंबर २०१०च्या अंकात आली आहे.