बेस्टमध्ये कनिष्ठ बस चालकाच्या १२४६ जागा
बृहन्मुंबई विद्युत वितरण आणि परिवहन उपक्रम (बेस्ट)मध्ये अनुसूचित जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी कनिष्ठ बस चालक ( १२४६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २१ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत सहायक वैद्यकीय अधिकारी पदाच्या ५९ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य खात्यात सहायक वैद्यकीय अधिकारी (५९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठीची निवड प्रक्रिया ५ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०१० या कालावधीत होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ता, सामना, लोकमतमध्ये दि. २४ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये २५० जागा
युनियन बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह (२५० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज www.unionbankofindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २२ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भुसावळ येथील रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये छाननी सहायकाच्या ३० जागा
भुसावळ येथील रेल्वे मेल सर्व्हिसमध्ये छाननी सहायक (३० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.