भेलमध्ये अधिकारी पदाच्या १२४ जागा
भारत हेवी ईलेक्ट्रिकल्स लिमिटेड (भेल) मध्ये उपव्यवस्थापक (७४ जागा), व्यवस्थापक (२४ जागा), वरिष्ठ व्यवस्थापक (१४ जागा), उपमहाव्यवस्थापक (१२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://careers.bhel.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१-२७ ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.
डाक विभागात डाक सहायक/छाननी सहायकाच्या १०१३ जागा
भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळात डाक सहायक/छाननी सहायक (१०१३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटीची तारीख ५ ऑक्टोबर २०१० पर्यंत आहे. अर्ज व इतर सविस्तर माहिती सर्व मुख्य टपाल कार्यालयात उपलब्ध आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. २० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय स्टेट बँकेत अधिकारी पदाच्या १८३ जागा
भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट अधिकारी पदाच्या १८३ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://sbi.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.