महाजनकोमध्ये २४५ जागा
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती मंडळात महा व्यवस्थापक- वित्त व लेखा (१ जागा), सह मुख्य लेखा अधिकारी (२ जागा), उपमुख्य लेखा अधिकारी (३ जागा), लेखा अधिकारी (८ जागा), विभागीय लेखापाल (१८ जागा), सहसंचालक-एचआर (१ जागा), एस्टॉब्लिशमेंट ऑफिसर (२ जागा), डेप्युटी एस्टॉब्लिशमेंट ऑफिसर (२ जागा), सहायक पर्सोनेल ऑफिसर (३ जागा), एस्टॉब्लिशमेंट सुपरिटेंडंट (१ जागा), मुख्य लिपिक (१ जागा), स्टेनो टायपिस्ट (१ जागा), दूरध्वनी चालक (३ जागा), सिस्टिम अनॉलिस्ट (१ जागा), उप कार्यकारी अभियंता (२९ जागा), सहायक अभियंता (१६९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.mahagenco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मध्य रेल्वेमध्ये खेळाडूंसाठी १२ जागा
मध्य रेल्वेमध्ये क्रीडा कोटय़ात ग्रुप सी मध्ये १२ जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.
केंद्र शासनाच्या अणू ऊर्जा विभागात ३९ जागा
केंद्र शासनाच्या अणु ऊर्जा विभागात तांत्रिक अधिकारी/अभियंता (३९ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे