पुणे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत ३२ जागा
पुणे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत (देहूरोड) कनिष्ठस्तर लिपिक (१३ जागा), स्टोअर किपर (१० जागा), पेंटर (३ जागा), फिटर (३ जागा), कारपेंटर (१ जागा), सॉवेर (१ जागा), पॅकर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदाची थेट भरती दि. ६ सप्टेंबर ते ८ सप्टेंबर २०१० या कालावधीत होईल. अधिक माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २१-२७ ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रकल्पग्रस्तांसाठी १९६ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रकल्पग्रस्तांसाठी पुरुष कामगार (१८१ जागा), महिला -आया (१५ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ सप्टेंबर २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
कृषी विभागात विविध पदांसाठी भरती
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागा मार्फत राबविण्यात येणार्या राज्याच्या कृषी विस्तार कार्यक्रमांना विस्तारविषयक सुधारणाकरिता सहाय्य (आत्मा) या योजनेअंतर्गत राज्य समन्वयक, संगणक आज्ञावली रुपरेषक, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक, विषय विशेषज्ञ ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.mahaagri.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २८ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.