महापारेषणमध्ये २८ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीत सहायक महाव्यवस्थापक-मानव संसाधन (४ जागा), वरिष्ठ व्यवसाथापक-मानव संसाधन (२ जागा), व्यवस्थापक-मानव संसाधन (६ जागा), उपव्यवस्थापक-मानव संसाधन (१ जागा), उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी (१ जागा), औद्योगिक संबंध/कल्याण अधिकारी (७ जागा), उपमुख्य दक्षता अधिकारी (१ जागा), उपमुख्य सुरक्षा अधिकारी (१ जागा), सहाय्यक मुख्य सुरक्षा अधिकारी/सहायक मुख्य सुरक्षा अधिकारी (२ जागा), कनिष्ठ सुरक्षा अधिकारी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.mahatransco.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॉनिकल इंजिनिअरिंगमध्ये २३ जागा
मिलिटरी कॉलेज ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड मेकॉनिकल इंजिनिअरिंग, सिकंदराबाद येथे कनिष्ठस्तर लिपिक (१ जागा), ड्राफ्टसमन (२ जागा), लॅबोरेटरी असिस्टंट (२ जागा), वाहन चालक (१४ जागा), सिनेमा ऑपरेटर (१ जागा), पोस्टर आर्टिस्ट (१ जागा), कुक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ७ ते १३ ऑगस्ट २०१० च्या अंकात आली आहे.
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठीच्या २४ जागा
रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी (२४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसरच्या ३७० जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये प्रोबेशनरी ऑफिसर (३७० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ सप्टेंबर २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज http://www.unitedbankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियंत्यांच्या १३४ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत अभियांत्रिकी विभागात दुय्यम अभियंता - स्थापत्य (३६ जागा), दुय्यम अभियंता -यांत्रिकी व विद्युत (५ जागा), दुय्यम अभियंता -वास्तूशास्त्रज्ञ (७ जागा), कनिष्ठ अभियंता - स्थापत्य (५८ जागा), कनिष्ठ अभियंता -यांत्रिकी व विद्युत (२८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठीच्या थेट मुलाखती दि. २३ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०१० या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळ, लोकमतमध्ये दि. ९ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेषाअंतर्गत ५ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेत अपंग अनुशेषाअंतर्गत वैद्यकीय अधिकारी (१ जागा), स्टाफ नर्स /नर्स मिडवाईफ (३ जागा), ऑक्झिलरी नर्स/मिडवाईफ (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती दि. २६ ऑगस्ट २०१० रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.nmmconline.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. मिड डे मध्ये दि. १० ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय हवाई दलात ८० जागा
भारतीय हवाई दलाच्या प्रशिक्षण मुख्यालयात सहायक स्टोअरकिपर (१ जागा), स्वयंपाकी (५८ जागा), स्टेनो (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (१६ जागा), सिव्हिलियन मेकॉनिकल ट्रान्सपोर्ट ड्रायव्हर (१ जागा), पेंटर (१ जागा), ड्राफ्टसमन (१ जागा), ज्युनिअर आर्टिस्ट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसाच्या आत करावे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१० च्या अंकात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेत खेळाडूंसाठी ८ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेत खेळाडूंसाठी कनिष्ठ लेखापरीक्षा व लेखा सहायक (८ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. २५ ऑगस्ट व २६ ऑगस्ट २०१० रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळमध्ये दि. ९ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
सातारा नगर परिषदेत १८ जागा
सातारा नगर परिषदेत राष्ट्रीय शहरी आरोग्य योजनेअंतर्गत लेखापाल नि डाटा एन्ट्री ऑपरेटर (२ जागा), नर्स (२ जागा), एएनएम (१ जागा), महिला कामगार (१३ जागा) ही पदे कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळमध्ये दि. ६ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागात अपंगांसाठी ३५ जागा
भारतीय अन्न महामंडळाच्या पश्चिम विभागात अपंगांसाठी मॅनेजमेंट ट्रेनी (३ जागा), कनिष्ठ अभियंता (१ जागा), सहायक (२ जागा), एजी (१६ जागा), टायपिस्ट (१ जागा), शिपाई (२ जागा), रखवालदार (९ जागा), स्वीपर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१० च्या अंकात आली आहे. अधिक माहिती http://specialtest.in/fci/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय अन्न महामंडळाच्या उत्तर विभागात १६०० जागा
भारतीय अन्न महामंडळाच्या उत्तर विभागात सहायक (१६०० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://specialtest.in/fci/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नेव्हल आर्मामेंट डेपोमध्ये २३ जागा
विशाखापट्टणम येथील नेव्हल आर्मामेंट डेपो येथे चार्जमन (३ जागा), सहायक स्टोअरकिपर (१२ जागा), ऍम्युनिशन मेकॉनिक (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१० च्या अंकात आली आहे.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात २० जागा
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठात कनिष्ठ सल्लागार (२० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३१ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://www.ycmou.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
नाशिक महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्याच्या ४ जागा
नाशिक महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकारी (४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. ३१ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेत २०० जागा
भारतीय रिझर्व्ह बँकेत एक्झिक्युटिव्ह इन्टर्न्स (२०० जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख २३ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://onlinedr.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३१ जुलै ते ६ ऑगस्ट २०१० च्या अंकात आली आहे.
टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये २२ जागा
टेलिकम्युनिकेशन कन्सल्टंट इंडिया लिमिटेडमध्ये व्यवस्थापक-वित्त (३ जागा), उपव्यवस्थापक-वित्त (४ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), लेखा अधिकारी (७ जागा), अकाउंटंट (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://tcil-india.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Source: Mahanews