Sunday, August 22, 2010

jobs| Maharashtra jobs 22 Aug 2010.

मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठीच्या ३ जागा
मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात महिला तलाठी (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

विशाखापट्टणम नेव्हल डॉकयार्डमध्ये १६९ जागा
विशाखापट्टणम येथील नेव्हल डॉकयार्डमध्ये ड्रेसमन (१६९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १४-२० ऑगस्ट २०१०च्या अंकात आली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत अधिकार्‍यांच्या ८८३ जागा
पंजाब नॅशनल बँकेत वरिष्ठ व्यवस्थापक-मार्केटिंग (३० जागा), व्यवस्थापक-क्रेडिट (५१ जागा), व्यवस्थापक-सुरक्षा (२७ जागा), व्यवस्थापक-टॅक्सेशन (२ जागा), उपव्यवस्थापक-विधी (१० जागा), कृषी अधिकारी (२१० जागा), औद्योगिक अधिकारी (१४० जागा), मनुष्यबळ विकास अधिकारी (२० जागा), अधिकारी - प्रिंटिंग टेक्नॉलॉजी (३ जागा), व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी (३९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ सप्टेंबर २०१० आहे.
अधिक माहिती www.pnbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. १८ ऑगस्ट २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तलाठी पदाच्या २३ जागा
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आस्थापनेवर तलाठी (२३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात http://thane.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.