ठाणे महानगरपालिकेत १२ जागा
ठाणे महानगरपालिकेत शिक्षणसेवक र(६ जागा), लिपिक (३ जागा), शिपाई (३ जागा) ही पदे मानधन तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०१० आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १४ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पुणे विद्यापीठात शिक्षक पदाच्या १०२ जागा
पुणे विद्यापीठात विविध विद्या शाखांमध्ये प्राध्यापक (२५ जागा), सहयोगी प्राध्यापक (३७ जागा), सहायक प्राध्यापक (४० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती www.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १० जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.
पुण्यातील ऑर्डनन्स फॅक्टरीत ६८ जागा
संरक्षण मंत्रालयाच्या पुणे येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत डेंजर बिल्डिंग वर्कर (१० जागा), फिटर (३१ जागा), मेकॉनिस्ट (६ जागा), कारपेंटर (६ जागा), इलेक्ट्रिशियन (३ जागा), टर्नर (४ जागा), मिलराइटर (१ जागा), पेंटर (६ जागा), मेडिकल असिस्टंट (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून २१ दिवसात करावते. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० जुलै - १६ जुलै २०१० च्या अंकात आली आहे.
महावितरणमध्ये २७ जागा
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये मुख्य अभियंता (२ जागा), अधिक्षक अभियंता (७ जागा), उपमहाव्यवस्थापक-पर्सोनेल (२ जागा), व्यवस्थापक-पर्सोनेल (२ जागा), महाव्यवस्थापक-वित्त व लेखा (२ जागा), व्यवस्थापक-वित्त व लेखा (३ जागा), उपमहाव्यवस्थापक-आयटी (५ जागा), अधिक्षक अभियंता-स्थापत्य (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ७ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती www.mahadiscom.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. १० जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.