Sunday, July 25, 2010

jobs|Marathi Jobline july 26,2010-3

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये वाहन चालकांसाठी ९१० जागा
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलमध्ये चालक - सरल भरती (६३५ जागा), चालक/विभागीय (५२ जागा), चालक-माजी सैनिक (८५ जागा), चालक सह पंप ऑपरेटर - सरल भरती (११४ जागा), चालक सह पंप ऑपरेटर - विभागीय (१० जागा), चालक सह पंप ऑपरेटर -माजी सैनिक (१४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती www.cist.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये २१ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरमध्ये २१२ जागा
भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटरच्या मुंबई आणि तारापूर येथील प्रकल्पात स्टायपेंडरी ट्रेनिज (२१२ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती www.barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २० जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयात ५१ जागा

सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालय, पुणे यांच्या अधिपत्याखालील कार्यालयात शिल्प निदेशक (५१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भारतीय स्टेट बँकेत ५६० जागा

भारतीय स्टेट बँकेत स्पेशालिस्ट मॅनेजमेंट एक्झिक्युटिव्ह (५०० जागा), स्पेशालिस्ट टेक्निकल एक्झिक्युटिव्ह (६० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती http://sbi.co.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात ११३ जागा
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विभागीय अग्निशमन अधिकारी (१ जागा), अग्निशमन केंद्र अधिकारी (१५ जागा), सहाय्यक अग्निशमन अधिकारी (७ जागा), ऑटोमोबाईल इंजिनिअर (१ जागा), उप अग्निशमन अधिकारी (३ जागा), कनिष्ठ संचार अधिकारी (१ जागा), ऑटो इलेक्ट्रिशियन (१ जागा), चालक यं६ चालक (५० जागा), अग्निशमन विमोचक (१८ जागा), मदतनीस-अग्निशमन (१६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती www.midcindia.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत ५ जागा

राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेत कनिष्ठ तांत्रिक सहायक (४ जागा), कनिष्ठ अभियंता (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती www.nio.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या १० जुलै - १६ जुलै २०१० च्या अंकात आली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत डाटा एन्ट्री ऑपरेटर व कनिष्ठ स्तर लिपिक पदासाठी भरती

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत कंबाईंड हायर सेकंडरी लेव्हल एक्झामिनेशनची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटर, कनिष्ठस्तर लिपिक ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://ssc.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


Resource: www.Mahanews.gov.in