सोलापूर विद्यापीठात १६ जागा
सोलापूर विद्यापीठात उपकुलसचिव (२ जागा), सिस्टिम अनॉलिस्ट (२ जागा), विद्यापीठ अभियंता (१ जागा), सहायक कुलसचिव (२ जागा), कायदा अधिकारी (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा), कक्ष अधिकारी (४ जागा), लेखापाल (१ जागा), कनिष्ठ अभियंता (१ जागा), प्रोग्रामर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती http://su.digitaluniversity.ac या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
भारतीय लष्करात विधी पदवीधर महिलांसाठी १० जागा
भारतीय लष्करात विधी पदवीधर झालेल्या महिलांसाठी १० जागा भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० ऑगस्ट २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ जुलै -९ जुलै २०१० च्या अंकात आली आहे.
ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये अधिकार्यांच्या २०० जागा
ओरियंटल बँक ऑफ कॉमर्समध्ये अधिकारी (२०० जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१० आहे. अधिक माहिती व अर्ज www.obcindia.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ३ जुलै -९ जुलै २०१० च्या अंकात आली आहे.
पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये १५ जागा
पॉवर फायनान्स कार्पोरेशनमध्ये व्यवस्थापक-टेक्निशियन (१ जागा), उपव्यवस्थापक (६ जागा), सहायक व्यवस्थापक (८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ ऑक्टोबर २०१० आहे. अधिक माहिती http://pfcindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
Resource: Mahanews.gov.in