महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सार्वजनिक आरोग्य विभागातील शरीरविकृती शास्त्रज्ञ-पॅथॉलॉजिस्ट (२ जागा), सांख्यिकी अधिकारी (१ जागा), कृषि व पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय व मत्स्यव्यवसाय विभागातील उप दुग्धशाळा अभियंता (१ जागा), दुग्धव्यवसाय विभागातील प्रशासन गट (६ जागा), पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक (१ जागा फक्त अपंगांसाठी), कनिष्ठ भूवैज्ञानिक (३ जागा फक्त अपंगांसाठी राखीव) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २८ ऑक्टोबर २००९ पर्यंत सादर करावेत. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. ३० सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनीच्या ३०० जागा
भारत संचार निगम लिमिटेडमध्ये मॅनेजमेंट ट्रेनी- ऑपरेशन (२५० जागा), मॅनेजमेंट ट्रेनी- फायनान्स (५० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती www.bsnl.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.
आयआयटी दिल्ली येथे १८ जागा
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथे कुलसचिव (१ जागा), इन्स्टिट्यूट इंजिनिअर (१ जागा), इंडस्ट्रियल लायझन ऑफिसर (१ जागा), सहायक कुलसचिव (२ जागा), सहायक कार्यकारी अभियंता (१ जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (३ जागा), कनिष्ठ तांत्रिक अधिक्षक (३ जागा), कनिष्ठ अभियंता (५ जागा), स्वच्छता निरीक्षक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.iitd.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.
subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews