Sunday, October 4, 2009

Government Jobs Dated05/10/09

नवी मुंबई महानगरपालिकेत वैद्यकीय अधिकार्‍यांच्या २ जागा
नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी (१ जागा), वैद्यकीय अधिकारी (१ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदांची थेट मुलाखत २९ ऑक्टोबर २००९ रोजी होणार आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. ३ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागात २० जागा

स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या पश्चिम विभागामार्फत स्टोअर किपर (१० जागा), डेप्युटी रेंजर (३ जागा), स्टेनोग्राफर (४ जागा), स्टॅटेटिकल असिस्टंट (१ जागा), कंपनी प्रोसेक्युटर (१ जागा), ज्युनिअर हिंदी ट्रान्स्लेटर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २००९ आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

संयुक्त संरक्षण सेवेत अधिकार्‍यांच्या ५१५ जागा
केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा २०१० या परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. या अंतर्गत भारतीय लष्करी प्रबोधिनी (२५० जागा), भारतीय नौदल अकादमी (४० जागा), हवाई दल अकादमी (३२ जागा), ऑफिसर ट्रेनिंग अकादमी (१७५ जागा), ऑफिसर ट्रेनिंग अकादमी-महिला (१८ जागा) येथील अधिकारी पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २००९ आहे. अधिक माहिती www.upsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

स्टाफ सिलेक्शन मार्फत टॅक्स असिस्टंटच्या ९०४ जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत टॅक्स असिस्टंट परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात टॅक्स असिस्टंट (९०४ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज ३० ऑक्टोबर २००९ पर्यंत भरावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

राजस्थान पोस्टमास्तर जनरल कार्यालयात २९८ जागा
राजस्थान पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात पोस्टल असिस्टंट (२५९ जागा), सॉर्टिंग असिस्टंट (३९ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ ऑक्टोबर २००९ पर्यंत पाठवावेत. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २५ सप्टेंबर - २ ऑक्टोबरच्या अंकात आली आहे.

subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews