Wednesday, September 23, 2009

Government Jobs Dated 24/09/09

सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओरिसामध्ये ३ जागा
सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ ओरिसा येथे परीक्षा नियंत्रक (१ जागा), तांत्रिक सहायक (१ जागा), कक्ष अधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ३० सप्टेंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.cuorissa.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संबंधीची सविस्तर जाहिरात दै. इंडियन एक्स्प्रेसच्या मुंबई आवृत्तीत दि. २२ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडमध्ये १० जागा
हिंदुस्तान एरोनॉटिकल लिमिटेडच्या बंगलोर येथील मॅनेजमेंट अकॅडमीत सिनिअर फॅकल्टी-बिझनेस डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग (१ जागा), फॅकल्टी- इंडस्ट्रियल अँड प्रोडक्शन इंजिनिअरिंग/फायनान्स मॅनेजमेंट (२ जागा), असिस्टंट लायब्ररी ऑफिसर (१ जागा), असिस्टंट सिस्टिम ऍंडमिनिस्ट्रेटर (१ जागा) या कायम स्वरुपी पदांसोबतच कंत्राटी तत्त्वावरील सिनिअर फॅकल्टी (३ जागा), फॅकल्टी (१ जागा), व्यवस्थापक - इलेक्ट्रिक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ९ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती http://www.hal-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये मागासवर्गीयांसाठी ७८ जागा
केंद्रीय विद्यालय संघटनमध्ये मागासवर्गीयांसाठी पदव्युत्तर पदवी शिक्षक (९ जागा), प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (२८ जागा), प्राथमिक शिक्षक (३१ जागा), चित्रकला शिक्षक (४ जागा), ग्रंथपाल (१ जागा), अनुभवी शिक्षक (१ जागा), संगीत शिक्षक (३ जागा), कनिष्ठ स्टेनोग्राफर (१ जागा), कनिष्ठस्तर लिपिक (२६ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १९ ऑक्टोंबर २००९ पर्यंत भरावेत. अधिक माहिती http://www.kvsangathan.nic.in/rec-scst-advt३.doc या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews