पुणे विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र व विस्तार विभागात सहाय्यक प्राध्यापक (३ जागा) हे पद कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख १० ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती विद्यापीठाच्या www.unipune.ernet.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. १९ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ९१ जागांची भरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शासनाच्या आस्थापनेवरील गृह विभागात सहायक सरकारी अभियोक्ता (८२ जागा), जलसंपदा विभागातील मृद सर्वेक्षण अधिकारी (२ जागा), उपमृद सर्वेक्षण अधिकारी (६ जागा), विधी व न्याय विभागातील ग्रंथपाल व संदर्भाधिकारी (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज २० ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. १९ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
गोवा लोकसेवा आयोगातर्फे १२ जागांची भरती
गोवा लोकसेवा आयोगातर्फे गोवा वैद्यकीय महाविद्यालयातील प्रोफेसर-रेडिओथेरपी (१ जागा), असिस्टंट प्रोफेसर-रेडिओथेरपी (१ जागा), गोवा औषधनिर्माण महाविद्यालयातील प्राचार्य (१ जागा), प्रोफेसर (२ जागा), असिस्टंट प्रोफेसर (१ जागा), अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालनालयात संचालक (१ जागा), गोवा आर्क्टिक्टेक्चर महाविद्यालयात असिस्टंट प्रोफेसर (१ जागा), गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्रोफेसर (४ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ६ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती www.goapsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियाच्या मुंबई आवृत्तीत दि. १६ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये २४० जागा
युनायटेड बँक ऑफ इंडियामध्ये क्रेडिट ऑफिसर (८५ जागा), फोरेक्स ऑफिसर (१५ जागा), फॅकल्टी (५ जागा), इक्विटी रिसर्च अनॉलिस्ट (५ जागा), आयटी ऑफिसर (१३० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ ऑक्टोंबर २००९ आहे. अधिक माहिती व अर्ज http://unitedbankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews