Wednesday, September 16, 2009

Government Jobs Dated 17/09/09

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात ४ जागा
महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगात कक्ष अधिकारी (२ जागा), लिपिक-टंकलेखक-नि-कार्यालयीन सहायक (२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १४ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. अधिक माहिती http://www.mercindia.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ताच्या मुंबई आवृत्तीत दि. १६ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भारत हेवी इलेक्ट्रिकलमध्ये अभियंत्यांच्या १६ जागा
भारत हेवी इलेक्ट्रिकल लिमिटेडच्या (भेल) राणीपेट, तामिळनाडू येथील प्लँटमध्ये अभियंता (१६ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज १७ ऑक्टोंबर २००९ पर्यंत करावेत. अधिक माहिती www.bhel.com. या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशनमध्ये १३०३ जागा
दिल्ली मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये अकाऊंट असिस्टंट (१८ जागा), कस्टमर रिलेशन असिस्टंट (३१८ जागा), मेंटेनर (९६१ जागा), स्टोअर असिस्टंट (३ जागा), फायर इन्स्पेक्टर (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १९ ऑक्टोंबर २००९ पर्यंत करावेत. अधिक माहिती www.delhimetrorail.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews