Thursday, November 4, 2010

Jobs | Maharashtra Jobs 04 Nov 2010-3

कोंकण रेल्वेमध्ये २५ जागा
कोंकण रेल्वे कार्पोरेशन लिमिटेडमध्ये सहायक प्रकल्प अभियंता (२ जागा), सेक्शन अभियंता (१० जागा), कार्यालयीन सहायक (३ जागा), तांत्रिक अधिकारी (५ जागा), लेखा सहायक (५ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती www.konkanrailway.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात ३७६ जागा
केंद्रीय राखीव पोलीस दलात सहायक पोलीस उपनिरीक्षक - स्टेनोग्राफर (१०३ जागा), हेडकॉन्स्टेबल (२७३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://crpf.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत ७ जागा
मुंबई जिल्हे एड्स नियंत्रण संस्थेत सल्लागार- ऐच्छिक रक्तदान (१ जागा), एम अँड इ अधिकारी (१ जागा), पीपीटीसीटी एम अँड इ ऑफिसर (१ जागा), सहायक संचालक -टीआय (१ जागा), वित्त अधिकारी (१ जागा), कॉम्प्युटर लिटरेट स्टेनो (१ जागा), कन्सलटंट पेडियाट्रिक एड्स-युनिसेफ (१ जागा) ही पदे कंत्राटी तत्वावर भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. २२ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.