Thursday, November 4, 2010

Jobs | Maharashtra Jobs 04 November 2010

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी पदाच्या ८० जागा
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये अधिकारी (८० जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पंजाब आणि सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसरच्या ७०० जागा
पंजाब आणि सिंध बँकेत प्रोबेशनरी ऑफिसर (४४० जागा), हिंदी ऑफिसर (१० जागा), सुरक्षा अधिकारी (२५ जागा), कृषि अधिकारी (१०० जागा), चार्टर्ड अकाऊंटंट (३० जागा), ईडीपी ऑफिसर (६० जागा), फोरेक्स ऑफिसर (३५ जागा) या पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती व अर्ज www.psbindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे विद्यापीठात १६ जागा
पुणे विद्यापीठात अंतर्गत हिशोब तपासणीस (१ जागा), सहायक वित्त अधिकारी (१ जागा), प्रोग्रामर (८ जागा), आरोग्य अधिकारी (१ जागा), उपअभियंता (२ जागा), कर्मशाळा अधिक्षक (१ जागा), स्थावर व्यवस्थापक (१ जागा), सहायक अभियंता-स्थापत्य (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०१० आहे. अधिक माहिती http://recruitment.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर माहिती दै. लोकमतमध्ये दि. १३ ऑक्टोबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.