Saturday, September 4, 2010

jobs| Maharashtra Jobs Sep 05, 2010-1

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये अभियंत्यांच्या ५५ जागा
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक अभियंता (५५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १४ दिवसाच्या आत करावे. अधिक माहिती. www.bel-india.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात दै. टाइम्स ऑफ इंडियामध्ये दि. १ सप्टेंबर २०१० रोजी आली आहे.

राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेत १५ जागा
मुंबई येथील राष्ट्रीय समुद्री विज्ञान संस्थेत प्रकल्प सहायक (१५ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. १५ सप्टेंबर व १६ सप्टेंबर २०१० रोजी होणार आहेत. अधिक माहिती www.nio.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. १ सप्टेंबर २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

ठाणे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत ४ जागा

ठाणे येथील जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेत उपअभियंता (१ जागा), सहायक प्रकल्प अधिकारी (१ जागा), तांत्रिक सहायक (१ जागा), लिपिक टंकलेखक (१ जागा) ही पदे करार तत्वावर भरण्यात येणार आहेत. या पदाच्या थेट मुलाखती दि. ४ सप्टेंबर २०१० रोजी होणार आहेत. यासंबंधीची अधिक माहिती http://ese.mah.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.