Wednesday, September 9, 2009

Government jobs dated 10/09/2009

बृहन्मुंबई महानगरपालिकेत शिक्षकांच्या १०७ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात पदवीधर/अपदवीधर प्रशिक्षित शिक्षक -माध्यमिक - हिंदी/गुजराती/इंग्रजी/कन्नड/तेलगू-तमिळ (एकूण १०७) या पदाची भरती करण्यात येणार आहे. या पदाची थेट भरती दि. १४ सप्टेंबर २००९ ते १५ सप्टेंबर २००९ या दरम्यान शिक्षणाधिकारी यांचे कार्यालय, हिंदू कॉलनी मनपा शालेय इमारत, लखमशी नप्पू मार्ग, दादर (पूर्व), मुंबई -४०००१४ या ठिकाणी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळच्या मुंबई आवृत्तीत दि. ८ सप्टेंबर २००९ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

कला संचालनालयात ग्रंथपालाच्या ३ जागा

महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयालयाच्या औरंगाबाद व मुंबई येथील कार्यालयात ग्रंथपाल (३ जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १ ऑक्टोंबर २००९ आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्सच्या मुंबई आवृत्तीत दि. ९ सप्टेंबर २००९ च्या अंकात आली आहे.

माझगाव डॉकमध्ये अधिकारी पदाच्या ६ जागा

माझगाव डॉक लिमिटेडमध्ये महाव्यवस्थापक- तांत्रिक (४ जागा), सहायक व्यवस्थापक (१ जागा), फायर ऑफिसर (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज १५ ऑक्टोंबर २००९ पर्यंत करावेत. अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ सप्टेंबर-११ सप्टेंबर २००९ या अंकात आली आहे.

पाँडेचरीच्या जवाहरलाल इन्स्टिट्यूटमध्ये नर्सच्या ९० जागा

जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्टग्रॅज्युएट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च, पाँडेचरी येथे स्टाफ नर्स (९० जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज ५ ऑक्टोंबर २००९ पर्यंत पाठवावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ सप्टेंबर-११ सप्टेंबर २००९ या अंकात आली आहे.

वस्त्रोद्योग मंत्रालयात १० जागा
वस्त्रोद्योग मंत्रालयात प्रयोगशाळा तंत्रज्ञ (१ जागा), प्रशिक्षक-विव्हिंग (१ जागा), प्रशिक्षक - प्रिंटर ( १ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ- विव्हिंग (२ जागा), प्रशिक्षक- प्रोसेसिंग (१ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ- प्रोसेसिंग (१ जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ- विव्हिंग (१ जागा), वारपर (१ जागा), लॅब अटेंडटं - विव्हिंग (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज ६० दिवसांत कराव्यात. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या ५ सप्टेंबर-११ सप्टेंबर २००९ या अंकात आली आहे.


subscribe With Us and get all the latest Result, Timetable, syllabus & job alert absolute free in your email box
मोफत जॉब अलर्ट,रिझल्ट्स,सिल्याबस,टाईमटेबल थेट तुमच्या इ-मेल बॉक्स मध्ये मिळवण्या साठी तुमच्या इ-मेल अड्रेस सोबत सबस्क्राइब करा
Resource:Mahanews