Saturday, July 3, 2010

Various Marathi jobs July 03

इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलात ३१ जागा
इंडो तिबेट सीमा सुरक्षा दलात निरीक्षक-हिंदी भाषांतरकार (३० जागा), निरीक्षक-संपादक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०१० आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ जून -२ जुलै २०१० च्या अंकात आली आहे. अधिक माहिती www.itbp.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पॉवर ग्रीड कार्पोरेशनमध्ये १४ जागा
पॉवर ग्रीड कार्पोरेशनमध्ये दक्षता अधिकारी (१ जागा), अकाउंट ऑफिसर (१ जागा), अभियंता (४ जागा), पर्यावरण व्यवस्थापन अधिकारी (५ जागा), राजभाषा अधिकारी (३ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ जुलै २०१० आहे. अधिक माहिती https://www.powergridindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

एमपीएससीतर्फे दिवाणी न्यायाधिशांच्या १०० जागांसाठी परीक्षा
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठस्तर) व न्याय दंडाधिकारी-प्रथम वर्ग पूर्व परीक्षा २०१०ची घोषणा करण्यात आली आहे. या पदांच्या एकूण १०० जागा आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ जुलै २०१० आहे. अधिक माहिती www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. २ जुलै २०१०
रोजी प्रसिद्ध झाली आहे.

मुंबई अग्निशमन दलात जीवरक्षकाच्या २३ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अग्निशमन दलात जीवरक्षक (२३ जागा) हे पद कंत्राटी तत्त्वावर भरण्यात येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुलै २०१० आहे. यासंबंधीची सविस्तर जाहिरात दै. सकाळमध्ये दि. २ जुलै २०१० रोजी प्रसिद्ध झाली आहे.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात २ जागा
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात कुलसचिव (१ जागा), संचालक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०१० आहे. अधिक माहिती www.srtmun.ac.in आणि www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ५३ जागा
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये डिफेन्स बँकिंग ऍडव्हायझर/सर्कल डिफेन्स बँकिंग ऍडव्हायझर (१५ जागा), उपव्यवस्थापक-सुरक्षा (३१ जागा), सहायक व्यवस्थापक-फायर (७ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०१० आहे. अधिक माहिती www.statebankofindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. सविस्तर जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या २६ जून -२ जुलै २०१० च्या अंकात आली आहे.